एकमेकींच्या हेतूंबाबत माहित नसलेल्या दोन प्रेमिकांच्या अवतीभोवती फिरणा-या या लघुपटाने ‘टॉप शॉर्टस् फिल्म फेस्टिवल यूएसए‘, ‘द इंडीफेस्ट फिल्म अवॉर्ड्स‘, ‘अॅक्टर्स अवॉर्ड लॉस एन्जल्स‘, ‘अॅकोलॅड ग्लोबल फिल्म कॉम्पीटीशन यूएसए‘, ‘मेडएफएफ‘ अशा प्रतिष्ठित सोहळ्यांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत
भारत, २१ जून २०१९: हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या आघाडीच्या व्हिडिओ ऑन डिमांड व्यासपीठाने आज नवीन लघुपट ‘फॉर ऑल दॅट यू आर‘ सादर केला. हा लघुपट विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन माजी प्रेमिकांच्या नात्याला दाखवतो. प्रेमातील अनपेक्षित ब्रेक-अपमुळे दोघी एकत्र येतात, पण दोघींनाही एकमेकींच्या हेतूंबाबत माहित नसते. अनपेक्षित ट्विस्ट्ससह लघुपट महिलांच्या विविध गोष्टींवरील विश्वासाला दाखवतो आणि अनपेक्षित क्लायमॅक्ससह प्रेक्षकांना अचंबित करतो. हंगामा प्ले व्यतिरिक्त हा लघुपट एअरटेल टीव्ही, अॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक आणि शेअरइटवरील हंगामा प्लेच्या माध्यमातून देखील स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच हंगामाच्या शाओमीसोबतच्या सहयोगाच्या माध्यमातून ग्राहक एमआय टीव्हीवरील हंगामा प्लेवर देखील लघुपट पाहू शकतील.
असामान्य थीमसाठी प्रशंसा करण्यात आलेल्या या लघुपटाने जगभरातील फिल्म फेस्टिवल्समध्ये विविध पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये ‘टॉप शॉर्टस् फिल्म फेस्टिवल यूएसए‘मध्ये ‘बेस्ट एलजीबीटीक्यू फिल्म‘ पुरस्कार, ‘द इंडीफेस्ट फिल्म अवॉर्डस्‘मध्ये ‘बेस्ट वुमन फिल्ममेकर‘ पुरस्कार, ‘अॅक्टर्स अवॉर्ड लॉस एन्जल्स‘ आणि ‘अॅकोलॅड ग्लोबल फिल्म कॉम्पीटीशन यूएसए‘,मध्ये ‘बेस्ट अॅक्ट्रेस‘ पुरस्कार, तसेच ‘मेडएफएफ‘मध्ये ‘बेस्ट शॉर्ट‘ पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘न्यूयॉर्क फिल्म अवॉर्डस्‘मध्ये लघुपटाची अधिकृत निवड झाली. तसेच लघुपट ‘नासाऊ फिल्म फेस्टिवल‘मध्ये सेमी-फायनालिस्ट होता.
या लघुपटाच्या रीलीजबाबत बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, ”आम्हाला आमच्या युजर्सना बहुभाषिक व बहुशैली लायब्ररी सादर करण्याचा अभिमान वाटतो. यामध्ये भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपट, माहितीपट, टीव्ही मालिका, लहान मुलांचे कार्यक्रम, ओरिजिनल शोज आणि लहान स्वरूपातील व्हिडिओ अशा व्यापक रेंजचा समावेश आहे. ‘फॉर ऑल दॅट यू आर‘ हा लघुपट आमच्या पुरस्कार-विजेत्या चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ट होईल आणि आमच्या प्रेक्षकांना नवीन पटकथा सादर करेल.”
अवंतिका खत्री यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून त्या लघुपटामध्ये तातियाना टॅटसह प्रमुख भूमिका साकारत आहेत. मॅड हॅटर्स बॅनरअंतर्गत अवंतिका खत्री आणि धीरज सरोदे यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.
आपल्या लघुपटाबाबत बोलताना अवंतिका खत्री म्हणाल्या, ”लघुपट ‘फॉर ऑल दॅट यू आर‘ माझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहे. हा माझा पहिला दिग्दर्शित लघुपट आहे आणि माझी कंपनी ‘मॅड हॅटर्स‘साठी अत्यंत यशस्वी असा हा लघुपट आहे. हा लघुपट दोन प्रमुख पात्रांमधील नाते अत्यंत भावनिकरित्या सादर करतो. प्रमुख पात्रं आपली छाप पाडतातच, शिवाय त्यांची कृत्ये पाहून प्रेक्षक अचंबित होतील. हंगामा प्लेवर हा लघुपट उपलब्ध असण्याचा मला आनंद होत आहे. यामुळे जगभरातील युजर्स माझा लघुपट पाहू शकतील.”
आजपासून हंगामा प्लेवर उपलब्ध असलेला लघुपट ‘फॉर ऑल दॅट यू आर‘ हंगामा प्लेच्या व्यापक कन्टेन्ट लायब्ररीमध्ये सामील होईल. या लायब्ररीमध्ये इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषांमधील ५००० हून अधिक चित्रपट, १५०० लघुपट, ओरिजिनल शोज, लहान मुलांचे कार्यकम, टीव्ही मालिका आणि संगीत, फिल्म गॉसिप, विनोद अशा विविध शैलींमधील १५०,००० हून अधिक लघु स्वरूपातील व्हिडिओ आहेत.
लघुपट येथे पाहा –