आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटने वेल्थ-एक्ससह प्रसिद्ध केला आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८
आयआयएफएल वेल्थ इंडेक्समध्ये संपन्न भारतावर परिणाम करणाऱ्या प्रमुख मुद्दयांचा शोध घेणारे तीन भाग: इंडियाज क्वांटम लीप, द इन्व्हेस्टर माइंडसेट आणि शेक अप दोज असेट्स
आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८ हा मोठी संपदा असलेल्या व्यक्तींचा अर्थात एचएनडब्ल्यूआय आणि अल्ट्रा एचएनडब्ल्यूआय यांचा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत सर्वसमावेशक अभ्यास, जगभरातील संपन्न लोकसंख्यांच्या पार्श्वभूमीवर या समुदायाचे मापन
आयआयएफएल वेल्थ इंडेक्स अभ्यास एचएनडब्ल्यूआय समुदायाचे वर्तन अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी करण्यात आला आणि फर्मने नुकत्याच जाहीर केलेल्या आयआयएफएल-वन प्लॅटफॉर्मचा हा एक भाग आहे. हा प्लॅटफॉर्म १० कोटींहून अधिक गुंतवणुकीजोगी मालमत्ता असलेल्या कुटुंबांना संपूर्ण पोर्टफोलिओ सल्ला सेवा पुरवतो
पुणे,१९ फेब्रुवारी २०१९: आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट या भारतातील अग्रगण्य संपदा व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने आज आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८ सीरिजचे अनावरण वेल्थ-एक्ससोबत धोरणात्मक भागीदारीत केले. वेल्थ-एक्स ही जागतिक संपदेविषयी माहिती देणारी अग्रगण्य कंपनी आहे.
या मालिकेचे तीन भाग आहेत. भारतातील संपत्तीवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्दयांचा वेध हे तीन खंड घेतात: इंडियाज क्वांटम लीप, द इन्व्हेस्टर माइंडसेट आणि शेक अप दोज असेट्स हे ते तीन भाग आहेत. हा इंडेक्स म्हणजे भारतातील एचएनडब्ल्यूआय आणि अल्ट्रा एचएनडब्ल्यूआय समुदायाचा आत्तापर्यंतचा सर्वांत सर्वसमावेशक अभ्यास आहे. जगभरातील धनाढ्य समुदायांच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास या समुदायाचे मापन अत्यंत निराळ्या पद्धतीने करतो.
आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८ हा आयआयएफल-वन या नुकत्याच लाँच झालेल्या प्लॅटफॉर्मने हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी एक आहे. १० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकयोग्य मालमत्ता असलेल्या कुटुंबांना हा प्लॅटफॉर्म कस्टमाइझ्ड पोर्टफोलियो व्यवस्थापन सेवा पुरवतो. आयआयएफएल-वन प्लॅटफॉर्म सुरू करून आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटने भारतातील संपदा व्यवस्थापनात मोठा बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये कमिशनच्या पारंपरिक अपारदर्शक रचनांना तसेच मध्यस्थांना व संपदा व्यवस्थापकांना उत्पादन निर्मात्यांकडून दिल्या जाणाऱ्या इन्सेंटिव्ह पद्धतीला आव्हान दिले जाणार आहे. आयआयएफएल-वन प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट ग्राहकासोबतच्या नात्यामध्ये पारदर्शकता आणण्याचे आहे. हा प्लॅटफॉर्म नाममात्र शुल्क आकारत असून, आपली उत्पादने पुढे रेटण्याच्या उद्योगक्षेत्रातील पारंपरिक पद्धतीपासून दूर राहणार आहे. आयआयएफल-वनला भारतातील संपदा व्यवस्थापन उद्योगात “नेटफ्लिक्सिफिकेशन” आणायचे आहे. म्हणजेच ग्राहकाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेत व त्याच्या गरजांप्रमाणे आपल्या कामाची पद्धत बदलून सबस्क्रिप्शनचे मॉडेल या क्षेत्रात आणायचे आहे.
आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८ हा आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याच्या फर्मच्या उपक्रमाचा सर्वोच्च भाग आहे.
“हे अनोखे अहवाल तयार करण्यासाठी वेल्थ-एक्ससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे,” असे आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक प्रवीण भालेराव म्हणाले, “आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८ भारतीयांच्या एचएनआय वर्तणूकीवरील व्यापक परिणाम सादर करते. ते त्यांचे गुंतवणूक वर्तन, छंद व रूचींची एक झलक दाखवते. आमचा विश्वास आहे की, भारतीय आर्थिक विकास व उद्योजकतेचा पुढील टप्पा विद्यमान भाग्यवान बिल्डर्सनी समर्थित असेल आणि ओल्ड मनी नवीन संधी घेऊन येतील.”
भारतातील हाय नेट वर्थ (एचएनडब्ल्यू) लोकसंख्येमध्ये गेल्या पाच वर्षांत ४० टक्के वाढ झाली असून, ती जगभरातील अन्य कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे भारताचे या श्रेणीत अनोखे स्थान निर्माण झाले आहे. जागतिक एचएनडब्ल्यू लोकसंख्या आणि तिच्याकडील संपत्ती याच काळात अनुक्रमे ३.२ टक्क्यांनी आणि ४.२ टक्क्यांनी वाढली आहे.
भाग ०१: इंडियाज क्वांटम लीप
जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारताची एचएनडब्ल्यू लोकसंख्या आपल्या जागतिक प्रतिस्पर्धींना वेगाने मागे टाकेल, असे अपेक्षित आहे. ही लोकसंख्या २०२१ सालापर्यंत ८६ टक्क्यांनी वाढणार आहे. ९५ ट्रिलियन एवढी एकत्रित मालमत्ता असलेल्या २,८४,१४० श्रीमंत व्यक्ती भारतात राहतात. हा आकडा २०२१ सालापर्यंत १८८ ट्रिलियन एवढा होईल, असा अंदाज आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८मधील पहिल्या खंडात वर्तवण्यात आला आहे. यामुळे जगातील सर्वांत शक्तिमान फॉर्च्युन लीडर्सचे नेतृत्व भारतीयांकडे येणार आहे. इंडियाज क्वांटम लीप या खंडात भारतातील या दमदार वाढीमध्ये योगदान देणाऱ्या घटकांचा बारकाईने आढावा घेण्यात आला आहे, त्याचबरोबर, देशातील श्रीमंत लोकसंख्येचे वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, संपत्तीचा स्रोत अशा आणखी काही घटकांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले आहे.
भाग ०२: इन्व्हेस्टर माइंडसेट
भारतातील श्रीमंत व्यक्ती देशांतर्गत व्यवसायावर लक्ष केंद्रित करत असले, तरी गुंतवणूक सल्लागार निवडताना मात्र ते जागतिक दृष्टिकोन देऊ शकणाऱ्या संपदा व्यवस्थापकाच्या शोधात असतात. दहशतवादापासून ते शेजारी राष्ट्र पाकिस्तानसोबत दीर्घकाळापासून असलेल्या तणावपूर्ण संबंधांपर्यंत सर्वत्र आर्थिक आणि राजकीय अनिश्चितता असूनही, केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भविष्यकाळ उज्ज्वल आहे यावर भारतातील धनाढ्यांचा विश्वास आहे. या आत्मविश्वासाचे रूपांतर आर्थिक भवितव्याबाबतच्या सशक्त समजेमध्ये कसे होते हे या इंडेक्समधील दुसरा खंड सांगतो. सर्वेक्षण केलेल्यांपैकी ९६ टक्के लोकांना वाटत आहे की, ते त्यांची उद्दिष्टे येत्या पाच वर्षांत साध्य करतील.
भाग ०३: शेक अप दोज असेट्स
भारतातील धनाढ्य जोखमीला घाबरत नाहीत पण आर्थिक गुंतवणुकींसाठी वैविध्यपूर्ण व आधुनिक धोरणाचा अवलंब करून ते संपदेचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करतात हे आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८ चा तिसरा भाग दाखवून देतो. भारतातील श्रीमंतांना त्यांच्या देशात उद्यमशीलतेची आणि सेवाभावाचा ठसा उमटवण्याची इच्छा आहेच पण त्यासोबतच आपला प्रभाव जगभर विस्तारण्याचे उद्दिष्टही त्यांच्यापुढे निश्चितच आहे. येत्या काही वर्षात ते जागतिक धनाढ्यांच्या यादीत वर चढणार आहेत. त्यामुळे अनेकांपुढे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची वाढवण्याचे लक्ष्य असू शकते. भारतातील मालमत्ता गुंतवणूकदार त्यांच्या मालमत्तेची घुसळण करण्यास सज्ज आहेत.
आयआयएफएल वेल्थ इंडेक्स २०१८मधील संपूर्ण निष्कर्ष तसेच ते काढण्यासाठी वापरलेल्या पद्धती यांबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी कृपया www.iiflwealth.com/wealth-x-2018 या लिंकवरून पूर्ण अहवाल डाउनलोड करा.
दरम्यान, आयआयएफएल-वनची ऑफरिंग्ज बळकट करण्यासाठी आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटने श्री. संदीप जेठवानी (व्यवस्थापकीय भागीदार आणि प्रमुख- सल्लागार सेवा) यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र डिलिव्हरी टीम तयार केली आहे. त्याचप्रमाणे श्री. उमंग पपनेजा (वरिष्ठ व्यवस्थापकीय भागीदार आणि प्रमुख- उत्पादने) यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मालमत्ता व्यवस्थापन टीम तयार केली आहे.