पुणे, १२ ऑगस्ट २०१९: फोक्सवॅगन इंडियाला पिंपरी, चिंचवडमधील गव्हर्नमेंट आयटीआयच्या सुधारणेसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांकरिता प्रशंसीपत्रासह सन्मानित करण्यात आले. राज्यातील तरूणांमध्ये कौशल्ये बिंबवण्याबरोबरच रोजगारक्षमता सुधारण्यामध्ये योगदान दिलेल्या फोक्सवॅगन इंडियासारख्या कॉर्पोरेट्सचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि गुंतवणूकीला प्रशंसित करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. फोक्सवॅगन ते कार्यरत असलेल्या भागांमधील पर्यावरण व समुदायाच्या एकूण विकासाप्रती योगदान देण्यामध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. कौशल्य विकास मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय राज्यपाल श्री. सी विद्यासागर यांच्या हस्ते फोक्सवॅगन इंडियाचा सन्मान करण्यात आला.
या मान्यतेबाबत बोलताना फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गुरूप्रताप बोपराई म्हणाले, ”आम्हाला भारत सरकारने पुणे जिल्ह्यातील सरकारी आयटीआयच्या (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) सुधारणेप्रती काम करणारी एक सक्रिय कॉर्पोरेट सहभागी म्हणून सन्मान केल्याचा अभिमान वाटतो. फोक्सवॅगन सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे आणि आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगारक्षम व भविष्यासाठी सुसज्ज करण्याकरिता सातत्याने पुढाकार घेत आहे.” ते पुढे म्हणाले, ”फोक्सवॅगन इंडिया शिक्षण सुविधा, हेल्थकेअर पाठिंबा आणि पर्यावरण संवर्धनाला चालना अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून समुदायांच्या विकासाला सक्रियपणे योगदान देत आली आहे. वर्षानुवर्षे हा दृष्टीकोन व निर्धाराने आम्हाला हजारो जीवन बदलण्यामध्ये, समाजाच्या उन्नतीसाठी सक्रियपणे योगदान देण्यामध्ये सक्षम केले आहे.”
अशा प्रकारचे उपक्रम आयटीआयमधून पदवी मिळवणा-या आणि उत्पादन क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवण्यामध्ये मदत करतात. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्षेत्राचा वास्तविक अनुभव आणि व्यावहारिक माहिती मिळते. फोक्सवॅगन शिक्षणाचा दर्जा सुधारण्याप्रती कटिबद्ध आहे. कंपनीने ऑटो उद्योगामध्ये शॉप फ्लोअरमधील आवश्यकतेनुसार कोर्स मॉड्यूल्स तयार करण्यासाठी देशभरातील विविध संस्थांसोबत सहयोग जोडला आहे.