पीआरबीएम पीसीसीएम २०१८ची सहावी आवृत्ती मॅरेथॉनचे विजेते घोषित

Marathi

पीआरबीएमकडून विजेत्यांचा ट्रॉफीज, कॅश प्राझेस आणि गिफ्ट व्हाउचर्स देऊन पीसीसीएममध्ये गौरव. मिलिंद सोमण आणि अदर पूनावाला  यांच्याकडून विजेत्यांना पुरस्कार प्रदान ~

पुणे, १८ नोव्हेंबर २०१८- पुणे रनिंग बियॉन्ड मायसेल्फ (पीआरबीएम)ने अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय)च्या सहकार्याने रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजीपूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन (पीसीसीएम)च्या विजेत्यांचा गौरव केला. 

या मॅरेथॉनला १४००० पेक्षा जास्त नोंदणींसह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचे उद्घाटन आयर्न मॅन मिलिंद सोमण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसीसीआय, कृष्णन कोमांडूर यांच्या हस्ते पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पहाटे ५.०० वाजता करण्यात आले. पीसीसीएमने शारीरिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारा संदेश दिला आणि पुणेकरांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मॅरेथॉनच्या रूटला एम्सने प्रमाणित केले असून महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशनने अधिस्वीकृती दिली आहे. या उपक्रमातून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य दिले गेले आणि त्यातून सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला गेला. तसेच पुणे महानगरपालिका, स्वच्छ भारत सर्वेक्षण आणि पुणे स्मार्ट सिटी या प्रकल्पांनाही पाठिंब दिला गेला.

पुणे रनिंग कायमच विविध कल्याणकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडीवर राहिली आहे आणि या वर्षी टीच फॉर इंडिया, इशविद्या, मुस्कान, बापू ट्रस्ट, लोक बिरादरी प्रकल्प, मुक्तांगण मित्र आणि एडव्हेंचर बियॉन्ड बॅरियर्स यांना लोककल्याणकारी उपक्रमांसाठी देणग्या दिल्या गेल्या.

हा दिवस अत्यंत उत्साहाने सुरू झाला आणि यात ४२.२ किमी पूर्ण मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. त्यापाठोपाठ २१.१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी मॅरेथॉन आणि ६ किमी आनंददायी धाव यांचा समावेश होता. समाजातील विविध वर्गांना सामावून घेण्याच्या पुणे रनिंगच्या ब्रीदवाक्यानुसार या उपक्रमात विविध दिव्यांग धावपटू तसेच युद्धातील इजा झालेले व्हीलचेअरवरील हिरो सहभागी झाले होते.

एपीसीसीआयचे संस्थापक आणि पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉनचे प्रायोजक हे शहरे राहण्यायोग्य बनवण्यासाठी तसेच अद्ययावत उपकऱणे आणि तंत्रज्ञान या उपक्रमाद्वारे शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी मिलिंद सोमण यांच्यासोबत २१ कि मी चे धावपटू, प्रदीप सिंग, मान सिंग, दीपक  कुंभार, पूनम दिनकर, मोनिका राऊत, आणि रिशू दल सिंगार यांना एलिट कॅटेगरी पुरस्कार प्रदान केले आणि त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला की ही मॅरेथॉन आपल्या नागरिकांना पुण्याचे रूपांतर स्वच्छ आणि हरित शहरात करण्यासाठी मदत करेल. सोमण यांनी धावपटूंना तसेच इतरांना धावणे ही निरोगी जीवनशैली म्हणून स्वीकारण्यासाठी १० किमीच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. 

या मॅरेथॉनचा समारोप पुरस्कार वितरण सोहळ्यात झाला आणि त्यात पुणे रनिंग आणि इतर अनेक प्रायोजकांनी विविध वर्गवारींमधील विजेत्यांचा गौरव केला.

पुणे रनिंग स्पोर्ट्स फाऊंडेशनची संकलपना असलेल्या पीआरबीएम २०१८ ला एपीसीसीआयने सहकार्य करून शीर्षक प्रायोजकत्व दिले आहे. तर, फोक्सवॅगन, सनगार्ड आणि आयसोबार यांनी कॉर्पोरेट भागीदार म्हणून पाठिंबा दिला आहे. एचआरएक्स एपेरल भागीदार आहेत, पेटीएम शॉपिंग भागीदार आहेत, कोटक महिंद्र बँक बँकिंग भागीदार, वेकफील्ड हे फूड भागीदार आणि क्लब महिंद्र हॉलिडे भागीदार आहेत.

विजेत्या वर्गवारी;

एलिट
वर्गवारीपुरूषस्त्री
२१.१ किमीविजेते -प्रदीप सिंग विजेते – पूनम दिनकर
 पहिले उपविजेते – मान सिंगपहिले उपविजेते – मोनिका राऊत
 दुसरे उपविजेते – दीपक  कुंभारदुसरे उपविजेते – रिशू  दल सिंगार
होशी
 पुरूषस्त्री
वर्गवारी४० वर्षांखाली४० वर्षांपेक्षा जास्त४० वर्षांखाली४० वर्षांपेक्षा जास्त
     
४२.२किमीविजेते अनुराग  कोंकरविजेतेशहरील  सुलैमानविजेतेनम्रता  पाटीलविजेतेनिकिता  गोविल
 पहिले उपविजेते– विशाल  शिळीमकरपहिले उपविजेतेसुनील  लहीगुडेपहिले उपविजेतेमेघा कुमारपहिले उपविजेतेप्रीती  मस्के
 दुसरे उपविजेतेलोकेश  मानेदुसरे उपविजेतेप्रशांत  कन्नोथदुसरे उपविजेतेपूर्णिमा  झादुसरे उपविजेतेमनीषा तकाते
     
२१.१ किमीविजेतेसागर  दळवीविजेतेगौरवविजेतेरुपाली कंधारकरविजेतेकविता  रेड्डी
 पहिले उपविजेतेजगतार सिंगपहिले उपविजेतेपराग  डोंगरेपहिले उपविजेतेनीलम  कांबळेपहिले उपविजेतेतन्मय  करमरकर
 दुसरे उपविजेतेअक्षय  मराठेदुसरे उपविजेतेसुभोजीत  रॉयदुसरे उपविजेतेदीप्ती  कोलारदुसरे उपविजेतेस्मिता कुलकर्णी
     
१० किमीविजेतेशानदार  सिंगविजेतेदत्तात्रय  जयभायविजेतेप्रियांका  चवरकरविजेतेअपर्णा  प्रभूदेसाई
 पहिले उपविजेतेगुरप्रीत  सिंगपहिले उपविजेतेलेस  कोसेकीपहिले उपविजेतेवृषाली  उतेकरपहिले उपविजेतेनिरुपम  पंत
 दुसरे उपविजेतेवीर  परदेसाईदुसरे उपविजेतेरोहतास  शर्मादुसरे उपविजेतेगार्गी  मिश्रादुसरे उपविजेतेसुषमा सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *