पुणे, ५ जून २०१९: अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) या पर्यावरण संवर्धन उपक्रमाने पुणे शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये मदत करण्यासाठी स्थानिक पुणेकरांसोबत एकत्र येत ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. एपीसीसीआय उपक्रम स्वच्छ शहराचे लाभ व महत्त्वासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यामध्ये अग्रस्थानी राहिला आहे. ही स्वच्छता मोहीम आणि पुणेकरांच्या मदतीने उपक्रमाने शहरामध्ये बदलाच्या दिशेने पुढाकार घेतला आहे.
कचरा न करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशासह आयोजित करण्यात आलेली स्वच्छता मोहीम शहरातील विस्तृत क्षेत्र व्यापून घेत यशस्वी ठरली. तसेच या मोहीमेला ऐरोस्पेस सुरक्षा विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, पुणे महानगरपालिका अशा प्रतिष्ठित सरकारी संस्थांमधील स्वयंसेवकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
स्थापनेपासूनच एपीसीसीआय कचरा न करण्याचे महत्त्व व त्याच्या लाभांसंदर्भात सल्ला देण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. या उपक्रमाने पुढाकार घेत पुणेकरांना या मोहीमेमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. या मोहीमेअंतर्गत लोकांना स्वच्छता, तसेच कचरा वेगळा ठेवणे आणि कच-याची सुरक्षित विल्हेवाट यांच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यात आले.

यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एपीसीसीआयने शहरातील दोन प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीमा राबवल्या. एपीसीसीआयने खुलेवाडीमध्ये ४ तासांची स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी, तसेच नागरिकांचा ऑन-ग्राऊण्ड व ऑनलाइन पाठिंबा मिळवण्यासाठी वायुदल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, ७ व्हिजन इव्हेण्ट्स व अशा इतर संस्थांसोबत सहयोग जोडला. स्वयंसेवकांना कचरा वेगळे करणे आणि कच-याची योग्य विल्हेवाट लावणे याबाबत योग्य सवयी अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित व जागरूक करण्यात आले. तसेच नेहा पाठक यांचा पक्ष्यांसाठी असलेल्या धोक्यांबाबतचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. कल्याणीनगर व आसपासच्या भागातील लोकांनी प्लोजेथॉन या अद्वितीय उपक्रमाचा अनुभव घेतला. या उपक्रमाला एपीसीसीआय, पीएमसी व केएनआरएचे पाठबळ लाभले. हा उपक्रम मॅरेथॉनप्रमाणे होता. यामध्ये स्वयंसेवकांना त्यांच्या मार्गावर जॉगिंग करत असताना रस्त्यावर पडलेला कचरा उचलायचा होता. पुणेकरांनी सक्रिय सहभाग घेत या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला आणि त्यांनी कचरा व्यवस्थापन व कचरा विल्हेवाटाची योग्य जीवनशैली अंगिकारण्याचे वचन घेतले.
या स्वच्छता मोहीमांबाबत बोलताना अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कृष्णन कोमंदूर म्हणाले, ”आम्ही स्वच्छतेचे महत्त्व व लाभांसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यामध्ये मदत करण्यासाठी विविध मोहीमांचे आयोजन केले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या स्वच्छता मोहीमेसाठी शहरातील लोक मोठ्या संख्येने पुढाकार घेण्यासाठी एकत्र आलेले पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. सहभागींनी निश्चयाने व उत्साहाने आयोजन केलेल्या मोहीमेचा स्तर पाहता आमच्या जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे.”

पुणेकरांनी एकत्र येत परिसर आणि रस्ते स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून एक बेंचमार्क स्थापित केला आहे. एपीसीसीआयने शहरातील नागरिकांच्या सहयोगाने विविध शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये विविध स्वच्छता व कचरा व्यवस्थापन जागरूकता मोहीमा यशस्वीरित्या राबवल्या आहेत. शहरातील स्वयंसेवकांना कचरा व्यवस्थापनाचा संदेश पसरवण्याचे आवाहन करत एपीसीसीआय लोकांचे साह्य व सक्रिय सहभागाच्या माध्यमातून शहरातील ६० टक्क्यांहून अधिक भागांपर्यंत संदेश पसरवण्यामध्ये यशस्वी ठरली आहे.
एपीसीसीआयने पुण्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येत उत्तम व स्थिर शहरासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे उदाहरण स्थापित करण्यामध्ये मदत केली आहे.