शालेय इमारतीचे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे ५ जून २०१८ रोजी करण्यात आले
मुलभूत प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच या अभ्यासक्रमातून मुलांमध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा आदर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यावरही भर दिला जातो
फोक्सवॅगन इंडियाच्या फडके वस्ती, निघोजे, पुणे येथील प्राथमिक शाळेला भारतीय हरित इमारत परिषदेकडून सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले. या इमारतीचे उद्घाटन २०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आले आणि मागील वर्षभराच्या कालावधीत या शाळेने विविध प्रकारचे सहभाग उपक्रम शाळेत आयोजित केले आहेत. त्यात पर्यावरण स्नेही उपक्रमांचा समावेश असलेले सण साजरे करणे, रिसायकल, पुनर्वापर आणि शाश्वतता या गोष्टी मुलांना शिकवताना ग्रीन क्लब आयोजित करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या शाळेचे बांधकाम फोक्सवॅगन इंडियाकडून सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमात योगदान म्हणून करण्यात आले होते. या शाळेच्या इमारतीत १२० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
भारतीय हरित इमारत परिषदेचे उद्दिष्ट शाश्वत वातावरणाच्या बांधकामाला मार्गदर्शन आणि प्रमाणित करण्याचे आहे, जेणेकरून नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर करता येईल, ऊर्जाबचत होईल, रिसायकल साहित्याचा वापर होऊन कचरा कमीत-कमी होईल. शाळेचे मूल्यमापन आठ निकषांवर करण्यात आले. त्यात साइटची निवड आणि नियोजन,ऊर्जा संवर्धन आणि वापर, शाश्वत जल पद्धती आणि अंतर्गत पर्यावरण दर्जा यांचा समावेश आहे. भारतीय हरित इमारत परिषदेने शाळेला ११० पैकी ८६ गुण मिळाल्यावर सुवर्ण प्रमाणपत्र प्रदान केले आहे.
फोक्सवॅगन इंडियाने बांधकाम प्रक्रियेत विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यात वास्तुरचना डिझाइन, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, लँडस्केपिंग आणि इंटिरियर डिझायनिंगचा समावेश होता. त्याचे व्यवस्थापन कंपनीच्या प्लान्ट इंजिनीअरिंग विभागात अंतर्गत तज्ञांनी केले.
हे प्रमाणपत्र प्राप्त केल्याबाबत श्री. गुरूप्रताप बोपराई, व्यवस्थापकीय संचालक, फोक्सवॅगन इंडिया म्हणाले की,”शिक्षण हा वाढीचा एक महत्वाचा घटक आहे आणि योग्य साधनसुविधा असल्यामुळे मुलाच्या विकासाच्या सुरूवातीच्या टप्प्यात एक वेगळेपण निर्माण होते. आम्ही बांधलेल्या शाळेला भारतीय हरित इमारत परिषदेकडून राष्ट्रीय सर्वोत्तमतेसाठी सुवर्ण प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत आम्ही विविध समुदायांसोबत काम करून दीर्घकालीन स्थितीत वाढ आणि विकास देण्यासाठी शाश्वत पर्यावरण कशा पद्धतीने निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केला. फोक्सवॅगन इंडिया विविध सामाजिक उपक्रमांद्वारे या समाजांच्या विकासात कार्यक्षमतेने योगदान देत आहे.”